निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.तर शिंदे गटाकडून जल्लोष करण्यात येत असताना. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आयोगाने शिवसेनेवर कोणाचा दावा यावर निर्णय देताना शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. यानंतर पुण्यात ठाकरे गटाकडून या निर्णयचा निषेध करण्यात येत आहे.